Marathi kavita on love – एखाद्यावर आपल असणार प्रेम हे व्यक्त करण्यासाठी कविता हे खूप सुंदर माध्यम आहे. आपल मन त्या व्यक्तीसमोर मोकळं करण्याची ताकत ही फक्त कविते मध्येच असते. आपले निखळ शब्द आपल्या विषयी आणि आपल्या आवडीच्या व्यक्तिविषयी खूप खोलवर बरच काही सांगून जातात. Marathi kavita on love त्या व्यक्ति समोर बोलू न शकणारे आपण. व्यक्त न होणारे आपण. या कविता मधून आपल मन दाखवू शकतो.. आपल्या भावना व्यक्त करू शकतो.त्या व्यक्तिच कौतुक, स्वभाव आपण शब्दामधून सजवून सांगू शकतो.
Marathi Kavita on Love
प्रेम म्हणजे रुसन फुगण असत.. प्रेम म्हणजे हळूच लाजन हसन असत.. कधी कधी अबोला भांडण ही असत.. वही च्या पानावर चार ओळीत ही प्रेम असत.. तासनतास वाट पाहण्यात ही प्रेमच असत.
आठवण काढत बसने म्हणजे प्रेम नसत.. न सांगताही समजून घेण म्हणजे प्रेम असत.. रोज समोर असून ही बोलायच नसतं.. एक एक क्षण वर्षा सारखा वाटत असला तरी.. भेटण्यासाठी तासभर आधीच जाऊन बसायच असत. तुझ्याशी बोलायच आहे. पण काय बोलू हेच कळत नसतं. तुला समजलं ना येवढच बोलून हसायच असत. तुझ्या साठी चंद्र सूर्य आणीन हे फक्त बोलायच असत नेहमी भेटल्यावर गिफ्ट मध्ये चोकलेटच असत.
प्रेम करन सोप्पं असत. पण निभावन सोप्पं नसतं.. सिनेमातल प्रेम हे काय खर नसतं.. कागदावर लिहून ते नुसतच वाचायच नसतं.. दूर राहून मनाला आजमवायच असत.. शाळेत कॉलेजात ही असच घडत असत.. नजरेने बोलून वहीच शेवटचं पान गिरवायच असत.. न बोलता ही बरच काही समजत असत.. पण कस बोलावं हेच कळत नसतं.. मराठी इंग्लिश च नेहमीच ग्रामर चुकत.. तुझ्या कौतुक करताना मात्र बरोबरच असत उद्या नक्की बोलेन म्हणून.. स्वताला मानवायच असत.. वाटेवर डोळे लाऊन.. न पाहिल्यासारख भासवायच असत.. हो की नाही यात मन खेळत राहत.. मनसारख्या उत्तरासाठी विचायच च राहून जात. प्रेमाच्या वाटेवर हे तर होतच असत.. कधी कुठे वाटसरु भेटेल माहीत नसतं.
रात्री चांदण्यात तुला शोधत बसते.. एकटक विचारात मधेच हसते.. एकच विचारायच आहे पण १० पान लिहते.. फक्त तूच वाचावेस म्हणून पुन्हा खोडून ही टाकते..
Marathi Kavita on Love
प्रेम असणार्याच माणसा सोबत भांडण होतात.. कधी रुसून तर कधी हसून व्यक्त होतात.. न बोलताही खूप काही सांगून बसतात.. होकाराची वाट पाहत दिवस पुढे सरतात.. पुन्हा कधीतरी भेट होईल. मनाची समजूत काढतात. समोर असल्यावर काही न बोलता निघून जातात.. पण जाताना मागे पाहून एकदा तरी हसतात.
मी मागे नसतानाही, असल्याचा भास होतो ना तुला! लोकांशी महत्वाचं बोलतानाही माझा जोक आठवतो ना तुला! आपण गर्दीत चालतानाही, माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला! इतरांसोबत जोरात हसतानाही, माझा दुरावा रडवतो ना तुला! कधी उदास वाटतानाही, माझा चेहरा हसवतो ना तुला! तुला नको असतानाही, माझा आवाज लाजवतो ना तुला! तू शब्दांनी नाकारतानाही चेहराच सांगतो ना मी आवडतो तुला. - विद्या भूतकर
खूप प्रेम करणार्या मानसा सोबत भांडायला आवडते भांडण झाल्यावर त्याला मनवायला आवडते.. जवळ नसल्यावर आठवनीत हरवायला आवडते जवळ असल्यावर उगाचच रूसायला आवडते प्रेम करत नाही हे दाखवायला आवडते जवळ नसल्यावर आठवून उगाचच हसायला आवडते.
Marathi Kavita on Love
फुलाचा प्राण हा त्याचा सुगंध आहे, तसा तू माझ्या साठी श्वास आहेस.. तुझ्या स्पर्शाने काटा येतो अंगावर, तु जगण्याचा ध्यास आहेस.. आयुष्याच्या रणरणत्या उन्हात हवीहवीशी वाटणारी तू सावली आहेस.. माझ्या प्रत्येक दिवसाची तू सुरवात आणि रात्रीची चांदणं रात्र आहेस..
तू आणि मी .. मी आणि तू .. तू चहा तर मी खारी.. तू साथ देशील तर जिंकेन ही दुनिया सारी.. तू चहा तर मी खारी.. तू आणि मी एकमेकसोबत दिसतो भारी..
वाट पाहत असते रात्रीची .. स्वप्नातल्या आपल्या भेटीची.. स्वप्नात हरवून झोपी जाते.. पुन्हा भेटशील कधी मी वाट पहाते.. मनातले शब्द डोळे सांगतात.. तुझ्या डोळ्यातल्या भावना मला सहज कळतात.. जेंव्हा उन्हात गार वारा स्पर्श करून जातो.. तुझा सहवास अंगाला भासतो..
Marathi Kavita on Love
माझ्या मनाला मला नाही आलं आवरता वेडं केलं प्रेमानं तुझ्या नाही आलं सावरता जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे मी होते पाहिले सौंदर्य ते डोळ्यात माझ्या नव्हते ग मावले वेगळी ती माझी नजर तुला आली ओळखता तू दिलीस कबुली प्रेमाची नजर ही न वळवता वेडं केलं प्रेमानं तुझ्या नाही आलं सावरता प्रयत्न तू करत होतीस पण लाज नाही लपली गाली हसलीस तेंव्हा अर्ध हास्य ओठांतुन पडलं खाली खाली पडणार हास्य तुझं मला नाही आलं झेलता गेलेला तो तोल माझा नाही आला सांभाळता वेडं केलं प्रेमानं तुझ्या नाही आलं सावरता होतीस लपवत आलेल्या ओठांवरच्या त्या शब्दांना डोळ्यातुन तुझ्या झळकल्या लपलेल्या त्या भावना बघत राहिलीस माझ्याकडे तू थोडीही न बावरता तुला बिलगलो मनानं मी जरा ही न ओशाळता वेडं केलं प्रेमानं तुझ्या नाही आलं सावरता माझ्या मनाला मला नाही आलं आवरता वेडं केलं प्रेमानं तुझ्या नाही आलं सावरता
मला तुला काही सांगायच आहे.. ऐकशील का.. शब्द नाही सापडत.. मनाची भाषा डोळ्यांनी समजून घेशील का.. मला तुला काही सांगायच आहे भेटशील का.. शिंपल्यातल्या मोत्या सारखं तुला जपेण.. तू फक्त हो म्हणशील का.. चंद्र तारे तर फक्त पौर्णिमेला च दिसतात.. पण आयुष्याच्या अंधारात शुक्र तारा बनशील का? मला तुला काही तरी सांगायच आहे.. सांग कधी भेटशील का..
Marathi Kavita on Love
प्रेम म्हणजे भावना.. प्रेम म्हणजे नात... सहवासाचा एक शब्द..आयष्यभराची मैत्री.. एकमेकाचे जीवनाची सोबती..
तुझ्यात जीव गुंतला कळेल का कधी तुला? तुझेच स्वप्न लोचनी तुझेच नाव चिंतनी इथे तिथे सभोवती तूच भासशी मला.. तुला न हे कळे परि मी कशी जळे उरी वेड हे न सोसते, परि न सोडते मला.. _ सुधीर मोघे.
तुझ्या आठवणीत अजूनही मन हरवते.. जुन्या आठवणी आठवून अश्रुंना लपवते.. लपवून प्रेम आणि न विसरुन आठवणी तुझ्याचसाठी लिहलेले हे शब्द तुज्याशिवाय आहेत सुनी.. तुझ्या आठवणीत अजूनही मन हरवते.. शब्द नसले तरी आठवणींना आठवून गाते.. कधी दुपारी चंद्र भासतो.. तुझ्या स्वप्नात रात्र सरुण दिवस उजाडतो..
तिने माझ्यावर प्रेम करावं.. डोळ्यांच्या कोपर्यातून मला बघाव.. मी पाहिल तर हसून लाजव.. लाजून ओठातच काही तरी बोलावं.. पहिल्या पावसात तिच्या सोबत भिजाव.. ओल्या पापणीत लपलेल्या तिच्या डोळ्यात स्वताला पाहावं.. तिच्या आठवणीत एक टक हरवून बसावं.. फक्त तिने एकदा माझ्यावर प्रेम कराव..
Marathi Kavita on Love
एक सांगू.. तू खूप गोड हसते.. हसताना तू खूप गोड दिसते.. पहिल्या पावसाच्या सुगंधात तू आठवते.. थेंबाच्या स्पर्शात तू भासते.. तुला पाहण्यासाठी तासन्तास वाट पाहतो.. गर्दीत ही तुझाच चेहरा शोधतो.. प्रेम होत तेंव्हा मन दुखावत.. उगाचच कोणावर तरी रागावत.. काही काळाने विसरून ही जात.. पण आयुष्याच्या वाटेवर पुन्हा कोणीतरी वाट आडवत.. नकोस वाटणार सगळं जग पुन्हा आवडायला लागत.. पडण्याची भीती मनात असूनही त्याच वाटेवर पुन्हा मन चालत.. जे होत ते चांगलच होत.. मनाची समजूत मनच काढत.. प्रेमाच्या वाटेवर हे असच होत.. कोणी क्षणात भेटत.. तर कोणी क्षणात सोडून जात.. कोणीतरी आपल असावं.. अस वाटणार प्रेम.. जेंव्हा होत.. तेंव्हा मन दुखावत.. खरे प्रेम असावे….. कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही… खरे प्रेम असावे….. गुलाबासारखे, जे ‘कोमल’ आणि ‘सुगंधी’ जरी असले, तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही… खरे प्रेम असावे,, आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण.. कुठेही गेले तरी न संपणारे, सदैव आपल्या बरोबर असणार कारण….. प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही.