100 Love Quotes in Marathi | मराठी लव्ह कोट्स

Love Quotes in Marathi – एखाद्या विषयी वाटणारे प्रेम, भावना शब्दांच्या मोजक्या ओळीमध्ये माळून त्याविषयी आपण व्यक्त होतो. त्या व्यक्तिसोबत ते शब्द वाटतो. आपल्या मनात असणारे त्यातून स्पष्ट होतात. अशा प्रकारचे भरपूर Love Quotes in Marathi मध्ये तुम्हाला खाली भेटतील.  

Love Quotes in Marathi 

विश्वास आणि प्रेम हे आरश्या सारखे असते. 
एकदा तडा गेला तर. पुन्हा जोडता येत नाही. 
न सांगता ही समजून घेणारी माणसं.. 
समजून पण न समजल्यासारखं करतात. 
चूक असो किंवा बरोबर असो,  
मैत्री असो किंवा प्रेम असो,  
सुख असो किंवा दू:ख असो. 
पण सोबत असण महत्वाच आहे.
तेंव्हा एकमेकांच्या चुका ह्या सहज सापडतात.. 
जेंव्हा मनातील प्रेमाच्या आरश्यावर धूळ साचते.
आयुष्याच्या प्रवासात खूप प्रवासी वाटेत भेटतात.. 
काही मध्येच उतरतात.. 
पण शेवटच्या STOP पर्यन्त मोजकेच सोबत असतात.
प्रेम आंदळ नसतं..  
आपले डोळे उशीरा उघडतात..
ऋतु बदलला की निसर्ग बदलतो. 
आणि मन बदललं की नाती बदलतात. 
काही शब्द कडू असले तरी.. 
त्या मागचा हेतु गोड असतो. 
प्रेम हे सहज होत.. पण समजायला वेळ लागतो.. 
प्रेम तुटत ही सहज.. पण विसरायला वेळ लागतो. 
काय बोलाव काही सुचतच नाही, तू समोर आल्यावर.. 
तूच ओळख माझ्या मनातलं, तुला पाहून हसल्यावर.
ते जीवनच काय, ज्यात तूझ प्रेम नाही.. 
ते प्रेमच काय, ज्यात तुझी आठवण नाही.. 
त्या आठवणीच काय, ज्यात तुझे क्षण नाही.. 

Love Quotes in Marathi 

एखाद्याचा सहवास हवासा वाटण, हे फक्त आकर्षण असत.. 
पण तोच सहवास जीवनभर निभावन हे खर प्रेम असत.. 
आयुष्याच्या वाटेवर आनोळखी माणस भेटतात.. 
काही क्षणाची सोबती.. पण कायमचे सोबती वाटतात. 
स्वप्न आहे तुझ्यासोबत जगावं.. तू हसताना तुला पाहण्यासाठी समोर मी असावं.. 
कागदावर लिहलेल्या तुझ्या नावात.. तुझ्या मागे माझ नाव असावं.. 
गंध तुझ्या प्रीतीचा अजून दरवळत आहे.. 
आयुष्याच्या प्रवासात मी तुझ्याच सोबत आहे. 
तू Simple आहेस.. म्हणून 
माझ्यासाठी Special आहेस.. 
खूप काही सांगायच असत पण नेहमी राहून जात.. 
तुझ्या सोबत असल्यावर मनातलं सगळ तुला आधीच उमजून जात. 
रोज रोज आठवण काढून रडण्यापेक्षा.. 
एकदा कायमचं विसरून गेलेलं बर. 
कधी कधी आपण दुसर्‍या व्यक्ति साठी स्वताला बदलतो.. 
पण नंतर ती व्याकतीच बदलून जाते. 
नाती तोपर्यंत चं टिकून राहतात..  
जोपर्यंच विश्वासाचे धागे अतूट राहतता. 
 सोबत हसणारी खूप लोक आयुष्यात भेटतात.. 
पण हसण्या मागे लपलेले दुख ओळखणारी खूप कमी भेटतात.  

Love Quotes in Marathi 

 
कष्टाला प्रेमाची साथ असेल तर,,  
नशीब बदलायला वेळ लागत नाही. 
कठीण परिस्थितीत सल्ले देणारे खूप भेटतात.. 
पण गरज साथ देणार्‍याची असते.. 
आयुष्याच्या वाटेत ठेच लागल्यावर सगळं खोट वाटत.. 
जेंव्हा पासून तुला पहिले.. सगळ जग आता सुंदर वाटत. 
तू आहेस तिथे मी आहे.. 
तूच आयुष्याची सुरवात आणि 
तूच अंत आहेस. 
माझ्यासाठी तू काय आहेस? 
सर्वस्व... 
स्वताच सौदर्य पाहण्यासाठी तुला आरशाची गरज नाही.. 
माझे डोळेच पुरेशे आहेत.. 
 विश्वास हा प्रेमचा आरसा आहे. 
तू अचानक समोर आल्यावर मन धडधडत... 
तुझा हात हातात घेतल्यावर सगळ काही स्वप्नच वाटत. 
जी व्यक्ति तुमच्या सुखात सुद्धा तुमच्या सोबत आहे. 
समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे.. आणि 
जी व्यक्ति दु:खात सुद्धा सोबत आहे. 
समजून जा तुमच्या दू:खात पण ती सुखी आहे. 
खर प्रेम तर एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. 
वाट चुकल्यावरच घरची ओढ भासते. 

Love Quotes in Marathi 

 
माझ एक स्वप्न आहे.. की मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. 
प्रेमात तीच लोक भांडतात.. 
जी एकमेकापासून दूर नाही राहू शकत. 
प्रेमात कोणी रागवतं तर कोणी रूसतं.. 
पण त्यात सुद्धा प्रेमचं लपलेल असतं.. 
तुझ्याच कौतुकाच्या कवितांना तुझा वाह वाह असायचा.. 
आज माझ्या Massage ला तुझा Reply पण नाही. 
तुझ्यावर प्रेम करणारे खूप भेटतील.. 
पण माझ्या मनातली जागा तुझ्याच साठी आहे. 
प्रेमात ओठांना बोलण्यासाठी शब्द सुचत नसले तरी,, 
डोळे सगळं काही बोलून जातात. 
प्रामाणिक व्यक्तिला प्रेमात.. 
प्रेमासोबत दू:ख सुद्धा पाचवाव लागत. 
आयुष्यात एकटं राहणं पण सोप नाही.. 
रोज खोट खोट हसाव लागत.
आयुष्यात गरज संपल्यावरच लोक पाहून सुद्धा Ignore करतात. 
मी सोबत असताना लागणारे माझे शब्द.. 
मी नसताना तुला खूप रडवतील. 

Love Quotes in Marathi 

आठवणी पेक्षा तुझ्या सोबत राहायच आहे. 
पहिलं नाही,, पण तू माझ शेवटचं प्रेम आहेस.
प्रेमात शब्द बोलायचे नसतात.. 
निभवायचे असतात.. 
 
प्रेम करताना खोट खोट बोलायला सोप्पं असतं.. 
पण प्रेमात खर खर समजून घेण अवघड असतं. 
तुझी आठवण ही पहिल्या पावसा सारखी आहे.. 
त्यात तुझ्या प्रेमाचं गंध आहे. 
एकतर्फी प्रेमात वेगळचं समाधान आहे.. 
कारण त्यात गमवण्या सारखं काहीच नसतं.. 
काही शब्द न बोलून पण समजतात.. 
कारण ती भाषा फक्त मनाला कळते. 
दोन मन मिळून एक नात तयार होत.. 
चूक असो किंवा बरोबर असो,  
मैत्री असो किंवा प्रेम असो,  
सुख असो किंवा दू:ख असो. 
पण सोबत असण महत्वाच आहे.
तुझ्या आठवणी पावसा सारख्या आहेत. 
एकटेपणाच्या उन्हात प्रेमाच्या सरी बरसतात.. 
आणि डोळे ओले करून अचानक नाहीशा होतात.
समज आणि गैर समज या प्रेमाच्या दोन बाजू आहेत.. 
यात कोणत्या बाजूने खेळ बदलेल सांगता येत नाही. 

Love Quotes in Marathi 

विचार वेगवेगळे असले तरी चालत.. 
पण मन एकसारख हव.
सुखी जगण्यासाठी दिलेली वचनं.. 
कधी कधी सुखी जगण्यासाठीच तोडावी लागतात. 
प्रेमात एकत्र जगण्यासाठी खूप कारण असतात.. 
तर कधी ती कारण संपून फक्त आठवणी शिल्लक राहतात. 
कधी कधी न आवडणार्‍या गोष्टी पण  
आवडत्या व्यक्ति सोबत आवडायला लागतात. 
प्रेमात आवड - निवड, हो - नाही असं काही नसतं.. 
यात All terms are accepted हे पक्क असतं.
प्रेम ही एक अशी भाषा आहे..  
ज्यात कोणतेच शब्द नाहीत. 
आणि ती कुठे शिकवली ही जात नाही..  
ती शिकण्यासाठी मन हवं.
 
स्वभाव हा एकसारखा नसला तरी चालेल.. 
पण आवडता हवा. 
प्रेमच्या वेळीवर आपली वाटणारी पान ही गळून पडतात.. 
पण काही काळाने त्या जागी नवी पान जागा घेतात. 
मनापासून प्रेम करणारी व्यक्ति  
शेवट पर्यंत वाट पाहते. 
डोळ्यांची भाषा ही डोळ्यांनाच समजते. 
आणि मनातली भावना ही मनालाच कळते. 
ज्या व्यक्तीच्या मनात कायम संशय असतो. 
त्या व्यक्तिला कधीच विश्वासू जोडीदार भेटत नाही. 

Love Quotes in Marathi 

प्रेमाच्या वेलीची मूळं ही मनाच्या मातीत खोलवर  
विश्वासरूपी रुजलेली असावी लागतात. 
विश्वास हा नियत पाहून च मजबूत होतो.. 
आणि नियत पाहूनचं तूटतो. 
आदर, विश्वास, काळजी आणि त्याग म्हणजे प्रेम. 
आयुष्यात आपल्याकडुन बर्‍याच चुका होतात. 
पण सगळ्यात मोठी चूक ती असते.. जी आप पुन्हा पुन्हा करतो. 
त्या व्यक्तिला पण वेळ दिला पाहिजे,  
ज्या व्यक्तीचा वेळ तुमच्या वाट पाहण्यात जात असतो. 
आदर हा प्रत्येक स्त्रीला दिलेला सर्वात सुंदर आणि मौल्यवान दागिना आहे.
विश्वास जिंकल्यावर व्यक्ति नजरेतून मनात उतरते. 
आणि विश्वास गमवल्यावर व्यक्ति नजरेतून उतरते.
आयुष्य एक प्रवास आहे. 
सहप्रवासी वाटेत भेटतात. काही मध्येच उतरतात. 
आणि काही शेवटपर्यंत सोबत राहतात.  
जी व्यक्ति साथ देते.. ती कधीच कारण देत नाही.. 
आणि कारण देणारी व्यक्ति कधीच साथ देत नाही. 
 कोणाला काही समजावून सांगून काही उपयोग नाही. 
कारण ते तेवढचं समजून घेतात जेवढ त्यांना समजतं. 

Love Quotes in Marathi 

 व्यक्त न झालेली नाती. 
कायम मनाच्या काळोखात स्वताला बंद करून घेतात. 
आज पुन्हा तुला पाहिल्यावर पावसात कोवळ ऊन पडल्यासारख वाटत. 
कारण त्यात आठवणीचा इंद्रधनुष्य दिसतो.
सुंदरता पाहण्यासाठी डोळे नाही.. 
नजर असावी लागते. 
प्रेमात व्यक्ति जरी दोन असल्या तरी.. 
मन हे एकचं असतं.. 
प्रेम हे कमवायचेे असते. 
मागून फक्त भीक मिळते. 
खर प्रेम हे सावली सारखं असत.. 
तुमच्या पासून सुरू आणि तुमच्या जवळच शेवट.
प्रेम हे माणसाला कविता करायला लावत. 
आणि आयुष्य धडा शिकायला शिकवत. 
प्रेम होण्यासाठी काही कारण लागत नाहीत.. 
आणि कारण असतील तर प्रेम होत नाही. 
प्रेमात दोन मनांना जोडणारी नाजुक रेशमी तार म्हणजे विश्वास.