Ukhane In Marathi For Female: लग्न कार्यात, हळदी कुंकू किंवा कोणत्याही शुभ कार्यात स्त्रिया जोडीदारचे नाव घेतात (उखाणा). अशा वेळी पटकन उखाणा आठवत नाही, किंवा अचानक आता काय उखाणा घ्यायचा असा प्रश्न येतो. त्यासाठी Ukhane In Marathi For Female तुम्हाला सहज सोप्पे आणि लक्षात राहतील असे उखाणे आहेत.
Ukhane In Marathi For Female
धनधान्याचं माप ओलांडून उजव पाऊल ठेवते.. आणि सगळ्यांचा आग्रह म्हणून ____ रावांचे नाव घेते.
सोन्याच्या समईत लावली साजूक तुपाची वात.. _____ रावांच्या सोबत करते सुखी संसाराची सुरवात.
लग्नाला केल दहा तोल्याच दोरलं.. ____ रावांच नाव माझ्या मनावर कोरलं.
कोकणातून आणले मासे ताजे ताजे.. _____ राव आहेत माझ्या मनाचे राजे.
श्रावणात आले पाच सोमवार.. ____ लाभले मला आयूष्याचे जोडीदार.
आयोध्येत विराजमान झाली श्री रामाची मुर्ती.. ____ सोबत लग्न होऊन पूर्ण झाली सुखी संसाराची इच्छापूर्ती.
सुख दुखाच्या सांसारात क्षण असावेत समाधानाचे.. _____ चं नाव घेऊन कुंकू लावते सौभाग्याचे.
तुळशी वृंदावणात दिवा लावते संध्याकाळी.. _____ चं नाव घेते हळदी कुंकवाच्य वेळी.
वरातीला केली बैलगाडी, गाडीला पांढर्या शुभ्र बैलांची जोडी.. _____ रावांमुळे आली संसाराला गोडी.
Ukhane In Marathi For Female
तिन्हिसांजेला लावते देवासमोर दिवा.. जन्मोजन्मी _____ चं जोडीदार म्हणून हवा.
जेजूरीच्या खंडोबाची चांदीची पालखी.. माझ्या वर आता फक्त ____ ची मालकी.
आंगण लोटायला आणला सोन्याचा झाडू.. मी आहे जलेबी तर, ____ राव लाडू.
सोन्याच्या मोहरा आणि चांदीची नाणी.. ___ राव बसले जेवायला मी वाढतेय पाणी.
वरातीला आणला पांढरा घोडा... ____ चं नाव घेते आता वाट सोडा.
भाकरी करायला आणली सोन्याची परात.. _____ रावांच नाव घेता घेता वरात आली दारात.
बाजारातून आणला हापूस आंबा.. ____ रावांच नाव घेते.. थोडा वेळ थांबा.
गोर्या गोर्या गालावर पडते खळी.. _____ चं नाव घेते लग्नाच्या वेळी.
श्रावणात बरसती पावसाच्या धारा.. _____रावांच नाव घेताच सुटतो थंडगार वारा.
लक्ष्मीच्या कृपेने घरात आहेत सुखाच्या राशी.. ____ चं नाव घेते आजच्या दिवशी.
लाल किल्ल्याला दरवाजे सतराशे साठ.. ____ राव बसले जेवायला मी वाढतेय ताट.
होईल कधी अशी भेट नव्हतं ध्यानी मणी... ____ चं आता माझ्या मनी..
Ukhane In Marathi For Female
लग्न झालं आता, संसार करूया सुखी... ____ चं नाव कायम माझ्या मुखी.
गुलाबाच्या फुलाला मोगर्याचा सुगंध.. _____ चं नाव घेताना होतो मला आनंद.
लग्न झालं दुपारी.. वाजले होते बारा.. ____ राव बसले खुर्चीत, मी घालते वारा.
प्रीतीचं झुळझुळ पाणी... मी आहे ____ रावांच्या दिलाची रानी.
चांदीची नोट सोन्याचा रुपया.. ____ चं नाव घेते.. बोला गणपती बाप्पा मोरया.
दत्त दत्त दत्ताची गाय.. _____रावांना आवडत नाही चहात दुधाची साय.
दारात काढली रांगोळी छान फुलांची.. झाले मी राणी _____ रावांच्या मनाची.
देवा पुढे लावली समईची जोडी.. _____ मुळे आली जीवनाला गोडी.
शुभकार्याची सुरवात होते श्री गणेशापासून.. ______ चं नाव घ्यायला सुरवात करते आज पासून.
चांदीच्या ताटात आंबे ठेवले कापून .. _____ चं नाव घेते दोन फोडी चाखून.
डोंगराच्या कुशीत आहे आपल सुंदर गाव.. सगळ्यांनी ऐका घेतो _____ चं नाव.
Ukhane In Marathi For Female
मंदिर चांदीच देवारा सोन्याचा.. _____ राव घेऊन आले हार १००० मण्याचा.
नेसायला पैठणी फिरायला गाडी.. _____ रावांनी बांधली माझ्यासाठी १० मजली माडी.
शंकरच्या मंदिरासमोर बसला आहे नंदी.. _____ च्या प्रेमाच्या तुरुंगात मी आहे बंदी.
जमिनीत पेरल धान्य पण पाऊसच पडेना.. _____ शिवाय आता मला गमेना.
मुहूर्त आला जवळ, केलाय मोट्टा थाट.. _____ ची मी बघतेय मांडवात वाट.
पत्रिकेत जुळले ३६ गुण.. ___ रावांचे नाव घेते _____ घरची सून.
रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस.. ____ रावांनी बांधला बंगला.. आणि आंगणात तुळस.
गोर्या गोर्या गालावर तीळ काळा. ____ सोबत फुलेल संसाराचा मळा.
लग्न होत दुपारी .. लग्नात आला पाऊस.. ____ राव बांधणार आहेत माझ्यासाठी चंद्रावर हाऊस.
जेवणाच्या पंगतीला आहे आहे कोथिंबीर वडी.. ____ आणि मी, आमची १ नंबर जोडी.
Ukhane In Marathi For Female
चंद्रा मुळे येते समुद्राला भरती.. संसाराच्या रथात _____ माझे सारथी.
शंकरच्या मंदिरासमोर बसला आहे नंदी.. _____ च्या प्रेमाच्या तुरुंगात मी आहे बंदी.
ब्याण्ड बाजा वाजतो जोरात. वरात आली दारात. _____रावांच घेते नाव ..घ्या आता घरात.
प्रेमाच्या सागरात गुलाबी होडी.. ____ मुळे आली संसारात गोडी.
आंबे ठेवले कापून, संत्र्याची काढली साल.. ____ च्या नावाचं कपाळी लावते कुंकू लाल.
संसारात सुखाचा कधी नफा कधी तोटा.. त्यात ____ चा सिंहाचा वाटा.
चांदीच्या विडयाला सोनाचे पान.. ____ रावांचे नाव घेतो ऐका देऊन कान.
राममंदिर बांधायला हनुमान होते एक हजार. ____ माझे आहेत सर्वगुण संपन्न हुशार.
समुद्रातून आणले पानी, त्याचे झाले मीठ.. मला आवडतात पुर्या म्हणून ____ राव मळत होते पीठ.
देवासमोर समोर लावली तुपाची वात.. सातजन्म मिळू दे मला ____ रावांची साथ.
Ukhane In Marathi For Female
गुलाबाच्या फुलाला मोगर्याचा सुगंध.. _____ चं नाव घेताना होतो मला आनंद.
देवासमोर समोर लावली तुपाची वात.. सातजन्म मिळू दे मला ____ रावांची साथ.
वासरू पिते दूध गाय खाते चारा.. _____ राव घरी आल्यावर मी घालते त्यांना वारा.
संकष्टीला केले उकडीचे मोदक, त्यावर घातले साजूक तूप.. _____ राव भुलले पाहून माझे रूप.
मांडव घातला दारी, वाजतो सनई-चौघडा.. _____ सोबत करते गृहप्रवेश वाट आमची सोडा.
शुभमंगल म्हणता अक्षता पडल्या डोक्यावर.. ______ रावांच राज्य आहे माझ्या मनावर.
आषाढिला येते पंढरीची वारी.. वारीला येते संताची पालखी.. संतांना लागली पांडुरंगाच्या भेटीची आस.. ____ रावांच नाव घेते तुमच्या साठी खास.
लक्ष्मीच्या कपाळी शोभतो कुंकुवाचा टिळा.. _____ रावांचे नाव घेते, एकदा सोडून दहा वेळा.
पांढर्या शुभ्र मोगर्याचा सुगंध पसरला छान.. _____ च नाव घेतल्यावर वाढतो माझा मान.
समुद्राच्या पाण्यात सापडले शिंमपले, शिंमपल्यात सापडले मोती.. _____ राव आहेत माझे सात जन्माचे सोबती.
Ukhane In Marathi For Female
विष्णूच्या नाभीतुन निघाले कमळ, कमळात बसले होते ब्रम्हदेव.. अग्नीला सातफेरे घेऊन ____ झाले माझे पतीदेव.
महादेवाच्या मंदिरासमोर बसला आहे नंदी.. _____ सोबत सौंसारात आहे मी आनंदी.
शुभ कार्याची सुरवात होते श्री गणेशापासून.. _____ चे नाव घेते हळूच गालात हसून.
स्वर्ग लोकी जमले ब्रम्हा विष्णु महेश.. _____ रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
वटपौर्णिमेला नवस करून सावित्रीने मागितला सत्यवान.. _____ सोबत संसार मांडून मी झाले भाग्यवान.
संकष्टीला केले उकडीचे मोदक, त्यावर घातले साजूक तूप.. _____ राव भुलले पाहून माझे रूप.
गोकुळात वाजवितो श्रीकृष्ण पावा.. संसार मांडला _____ सोबत, तुमचा आशीर्वाद असावा.
कौशल्येच्या पोटी आला राम नावाचा पुत्र.. देवांच्या साक्षीने गळ्यात बांधले _____ रावांच्या नावाचे मंगळसूत्र.
सोन्याचा देवाची चांदीची पालखी.. माझ्या मनावर फक्त ____ रावांची मालकी.
Ukhane In Marathi For Female
दरातल्या तुळशीला घालते पाणी.. ____ राव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी.
धनधान्याचं माप ओलांडून उजव पाऊल ठेवते.. आणि सगळ्यांचा आग्रह म्हणून ____ रावांचे नाव घेते.
देवा ब्राम्हणच्या साक्षीने लग्न केले दारात.. _____ रावांच नाव घेते आता जाऊ द्या घरात.
चाफ्याच्या झाडावर कोकिळा गाते गाणी.. _____ राव माझे धनी मी त्यांची राणी.
शृंगार केला पैठणीचा दिवस आहे आज विशेष.. ____ रावांच नाव घेऊन करते मी गृहप्रवेश.