101 Best Motivational Quotes, Status in Marathi | प्रेरनादायक मराठी कोट्स, स्टेटस

Motivational Quotes, Status in Marathi- आयुष्यात बर्‍याच वेळा अनेक संकट येतात. कठीण प्रसंगातून जाव लागत. अशा वेळी आपणाला आपल्या माणसांची, प्रेरणेची (Motivational Quotes, Status in Marathi) गरज असते. त्यासाठी प्रेरनादायक मराठी कोट्स तुम्हाला येथे मिळतील. Motivational Quotes, Status in Marathi मुळे सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.

Motivational Quotes, Status in Marathi

मोठ मोठ्या लाटांना धडक मारून जी जहाज पुढे जातात, तीच समुद्र जिंकतात.
काही शब्द कडू असले तरी, त्यांचा हेतु गोड असतो.
संगत ही विचारांच्यावर पडणारी सावली आहे.
संगत म्हणजे कृष्ण आणि शकुनी, योग्य संगत असेल तरचं विजय आहे.
हातोड्याचे घाव खाल्ल्यावर चं लोखंड मजबूत होत.
चांगल्या वेळीची फक्त वाट बघत बसाल तर, वाईट वेळ कधीच संपणार नाही.
शब्द जर तलवार असेल तर, विचार हे ढाल आहेत.

Motivational Quotes, Status in Marathi

निर्णय हे कधी चुकीचे नसतात. ते सिद्ध करायचे असतात.
यश जर स्वताला पाहिजे असेल, मार्ग सुद्धा स्वत: बनवावा लागतो.
लांब उडी मारण्यासाठी दोन पावलं माग जाव लागत.
अपयशावर मात करायची असेल तर मार्ग बदला, लक्ष बदलू नका.
हारल्यावर लोकं नावं ठेवतात आणि, जिंकल्यावर लोक नाव काढतात.
एका रात्रीत नशीब बदलते पण, त्या मागे कित्येक दिवसांची मेहनत असते.
लोक आपल्यावर जळायला लागले की समजून जायच, आपण प्रगति करतोय.
सराव जेंव्हा सवय बनते, तेंव्हा अपयश मागे जाऊन यश मिळते.
स्वप्न ही खरी होतात, फक्त ती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागतात.
सातत्य असेल तर कठोर दगडाला ही पाणी भेदून तोडून टाकते.
यशाचे ढोल वाजवायचे असतील तर, मेहनत शांततेत करा.
खूप कमी लोक यशस्वी होतात, कारण खूप कमी लोकचं वेगळी वाट निवडतात.
यश हे स्वताला हवे असेल तर, निर्णय देखील स्वताचा हवा.
संधी कधी चालून येत नाही, ती निर्माण करावी लागते.

Motivational Quotes, Status in Marathi

नशीब बदलायला हातावर रेषा लागत नाही, तर मनगटात ताकत असावी लागते.
तलवारीला शिक्षणाचं पाणी पाजल तर, विचारांना धार येते.
मेहनत ही चंदना सारखी आहे, जेवढ उगळाल तेवढा यशाचा सुगंध येईल.
कारण शोधत बसाल तर, ध्येय कधी सापडणार नाही.
गैरसमज हा रंगीत काचेचा सारखा आहे, त्यातून पाहिल्यावर सर्व काही त्याच रंगाचं दिसत.
वादविवाद मध्ये बुद्धीचा कमी जास्त पणा दिसतो, संवादामध्ये विचारांची समानता दिसते.
भुखेला जीव समोर असताना, देवाला नैवेद्य दाखवणे पाप आहे.
स्वता घेतलेल्या निर्णय चुकला, त्यातून यश नाही मिळालं तरी अनुभव नक्की मिळतो.
जगाची विचारपूस करत बसन्यापेक्षा, स्वताच्या ध्येयाला काय हव नको ते पहिलं पाहिजे. 
यशस्वी होण्याचा मार्ग शोधाचा नसतो, स्वता बनवायचा असतो.
संकटांना न घाबरता, त्यांना भेदूनचं यशाचा निशाणा साधता येतो.
स्वप्न बघायला पैशे लागत नाहीत, पण ती खरी करण्यासाठी आयुष्य खर्च कराव लागतं.
नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशीब तुमच्या कष्टावर अवलंबून असते.

Motivational Quotes, Status in Marathi

आनंदातील कौतुका पेक्षा, दु:खातील अनुभव जास्त जवळचे वाटतात.
यश मिळवायला वेळ लागत नाही, तर मनापासून केलेले कष्ट लागतात.
विचारांना कृतीची साथ असेल तरचं स्वप्न खरी होतात.
स्वप्नांच्या वृक्षाला कष्टाचे पाणी, आणि प्रयत्नांची मशागत असले तरच त्याला यशाची गोड फळ लागतात.
कानांनी ऐकलेल्या बर्‍याच गोष्टी, डोळ्यांनी खर्‍या खोट्या पाहिल्याशिवाय, तोंडाने काहीही बोलू नका.
कोणतेही काम ५० टक्के तेंव्हाच पूर्ण होऊन जात जेंव्हा तुम्ही ते सुरू करता.
पुस्तकं आणि माणस वाचल्याशिवाय कळत नाहीत.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, त्यासाठो तुमचे विचार स्कारात्मक हवे.
स्वप्न खरी होण्यासाठी आधी ती पाहावी लागतात.
मागून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही भीक आहे, आणि मेहनत करून करून मिळालेली गोष्ट हे यश आहे.
परिस्थितीची जाणीव आणि यशाची उणीव यामुळे माणूस घडतो.
स्वाभिमान हा सर्वात महाग दागिना आहे. एकदा विकला गेला तर पुन्हा खरेदी करता येत नाही.
आयुष्य तेजस्वी बनवायचे असेल तर स्वत: प्रज्वलित व्हा.
संघर्ष हे प्रगतिचे लक्षण आहे. ज्याची अंगी ते आहे. त्याचे भविष्य उज्वल आहे.
समोर असताना गुणगान, पाठीमागे अपमान. दुनिया अशीच आहे बेइमान.
न मागता केलेली मदत लोक सहज विसरून जातात.
परिसस्थितीच्या शाळेत जबाबदारीचं पुस्तकं सर्व काही शिकवत.
स्वाभिमान हा स्वत:च्या कष्टाच्या फाटक्या कपड्यात ही रुबाबदार दिसतो.
आकाशात ऊंच उडायच असेल तर माती पासून दूर जाव लागत.
आयुष्यात आपल्या नावासमोर एक पदवी कायमं असायला हवी, ती म्हणजे चांगला माणूस.
जीवनाच्या शेवटी स्वत:सोबत फक्त एकच गोष्ट घेऊन जातो. इज्जत.
कष्ट करायला जो माणूस काळ वेळ पाहत नाही, भविष्यात तो नक्कीच चांगले दिवस पाहतो.
वाणी आणि विचार या वरुन माणसाची कुवत ठरते.
चांगुलपणा हा जास्त दाखवला तर लोक त्याचा फायदा घेतात.

Motivational Quotes, Status in Marathi

नाही हा शब्द तुम्हाला कमजोर बनवत नाही.
सतत दुसर्‍याला सांगत बसण्यापेक्षा कधी कधी स्वत:हून समजून घेतलं पाहिजे.
घरच्या भाकरी ची किंमत तेंव्हा कळते जेंव्हा आपण स्वत:च्या पैशाने फक्त वडपावच परवडतो.
ठेच लाग्यावर वेदना झाल्या तरी त्यामुळे विचारांना धार येते.
डोक्यात अक्कल येण्यासाठी पायांना ठेच खावी लागते.
माणुसकीच्या बाजारात एकाच गोष्टीची किंमत लावली जाते. ईमान
पडलो म्हणून घाबरायच नाही, हारलो म्हणून रडायच नाही, मंजिल गाठल्याशिवाय जिद्द सोडायची नाही.
यशाचे लक्ष साधायचे असेल तर, कष्टाच्या धनुष्यावर जिद्द रूपी बाण हवा.
गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर, स्वत:चे पंख मजबूत आणि विशाल बनवा.
भीती माणसाला कमजोर बनवते. आणि धाडस माणसाला विजेता बनवतो.
यशाला हात घालायचा असेल तर स्वत:च्या पायावर उभं राहता आल पाहिजे.
रडयला नाही, तर लढायला शिका.
यशाच्या उंच शिखरावरूचं आयुष्य सुंदर दिसते.
मनुष्याने मनाने श्रीमंत आणि अहंकाराणे गरीब असयला हव.
शर्यत जिंकता आली नाही तरी चालेल पण ती गजवता आली पाहिजे. 
प्रयत्नांनी टाकलेल प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात.
यशाची गगनभरारी मारायची असेल तर, प्रयत्नाच्या पंखामध्ये जिद्द, धाडस आणि हिम्मत असला हवी.
कठोर शब्दांच्या मागे भक्कम अनुभव उभा असतो.
युद्धात शत्रूला हरवण्या आधी त्याच्या हिंम्मतीला हरवणे महत्वाचे असते.
यश हातात आल्यावर नाही, तर ते पचवल्यावरचं विजय निच्छित होतो.
कोणाची तरी सोबत मिळेल म्हणून वाट बघत बसू नका. चालत रहा, पुढे तुम्ही कोणाला तरी सोबत देऊ शकाल.
पावसाची वाट बघत बसण्यापेक्षा समुद्राकडे चालत रहा.
यशाच्या मार्ग हा आपल्या पायाखालीच आहे, फक्त आपण चालल पाहिजे.
मार्ग दिसत नाही अस कधी होत नाही, दोष डोळ्यांचा नाही, नजरेचा आहे.
इतिहास बनवायचा असेल तर सर्वात आधी आपली धाव भविष्याकडे असायला हवी.
मदत मागितल्याने कोणी लहान होत नाही, पण मदत केल्याने नक्कीच मोठ होता येत.
आपल्या सोबत कोणी नाही म्हणून काय झाल, आकाशात उंचावर गरुड हा एकटाच असतो.
यश हे आपल्या कपाळीच असत, फक्त मेहनतिने त्यावरची धूळ साफ कराची असते.
आपली बरोबरी न करणारेचं लोक आपल्या विषयी वाईट बोलतात. 
वेळ खराब असेल तर, लोक वाट नाही दाखवत... चुका दाखवतात.
इतरांच्या पेक्षा मोठ बनायच असेल तर, खराब पेक्षा खराब परिस्थिती मध्ये पण लढता आल पाहिजे.

Motivational Quotes, Status in Marathi

वेडे लोक चं इतिहास घडवतात, आणि नंतर शहाणे लोक त्याचं इतिहासाचा अभ्यास करतात.
तुमचा मार्ग तुम्ही स्वत: निवडा, कारण तुम्ही स्वत: जास्त चांगलं ओळखता.
आरडा-ओरड करून प्रसिद्धी नाही मिळत, कर्म असे करा की शांततेत सुद्धा चर्चा होईल.
नशीब पण राजा त्यालाच बनवतं, ज्याच्या अंगात काही करून दाखवायची धमक आहे.
सयंम हा धनुष्यावर ताणलेला बनसारखा असतो. जेवढा जास्त ताणला जाईल, त्याचा प्रभाव ही तितकाच मोठा असतो.
प्रत्येक पाऊल बरोबरच पडेल अस नाही, पण प्रत्येक पावलासोबत एक एक गोष्ट शिकत च माणूस ध्येय गाठू शकतो.
निर्णय योग्य नसतात, त्यांची योग्यता सिद्ध करून दाखवावी लागते. 
भरलेला खिसा दुनिया दाखवतो, आणि रिकामी खिसा दुनियादारी दाखवतो.
संधी ही प्रत्येकाला मिळते,पण त्याच सोन कराच की माती हे त्याच त्यान ठरवायचं॰
संकटांचे आभार माना, त्यामुळेच आपले कोण आणि परके कोण कळतं.
स्वाभिमाना पुढे नाती तुटली तरी त्यांचं दु:ख नाही वाटत, समाधान वाटते.
स्वत: निवडलेल्या वाटेवर माणूस कधी हरवत नाही, त्याला त्याची मंजिल माहीत असते.
अपयश पचवल्याशिवाय यशाची खरी चव ओळखता येत नाही.
बापजाद्यांपासून मिळालेल्या संपत्तीची जान आणि, स्व कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचा अभिमान असयला हवा.
निर्णय स्वत:चे असावेत, कारण निर्णय बरोबर ठरला तर कोणी म्हणेल "मी सांगितलं म्हणून झालं."
आपल्या बोलण्यात गोडवा नसला तरी चालेल पण स्पष्ठता हवी.
कोणतीही गोष्ट जगाला समजवण्यात वेळ वाया घालू नका, ती गोष्ट सिद्ध करा. जग तुमच्याकडे तुमचा वेळ मागेल.
कोणतीही गोष्ट जगाला समजवण्यात वेळ वाया घालू नका, ती गोष्ट सिद्ध करा. जग तुमच्याकडे तुमचा वेळ मागेल.