Marathi Ukhane For Male- महाराष्ट्रा मध्ये लग्नात उखाणे घेण्याची पध्दत आहे. आपल्या जोडीदारचं नाव लग्नात घेताना ते.. विशिष्ट शब्दात रचून घेतात.. कविता, चारोळी प्रमाणे. यामध्ये स्त्रिया आपल्या पतीचे आणि पुरुष Marathi Ukhane For Male आपल्या पत्नीचे नाव उखाणा घेतात. आणि खूप सारे Marathi उखाणे तुम्हाला येथे मिळतील. Marathi ukhane for male हे तुम्हाला लग्नात खूप उपयोगी पडतील.
Marathi Ukhane For Male
राममंदिर बांधायला हनुमान होते एक हजार. ____ माझी आहे सर्वगुण संपन्न हुशार.
चांदीच्या विडयाला सोनाचे पान.. ____ चे नाव घेतो ऐका देऊन कान.
संसारात सुखाचा कधी नफा कधी तोटा.. त्यात ____ चा सिंहाचा वाटा.
आंबे ठेवले कापून, संत्र्याची काढली साल.. ____ च्या कपाळी लावतो कुंकू लाल.
लग्नात केलाय मोट्ठा थाट.. बसायला आहे चांदीचा पाट.. भूक लागलेय खूप.. _____ लवकर आण जेवनाच ताट.
प्रेमाच्या सागरात गुलाबी होडी.. ____ मुळे आली संसारात गोडी.
ब्याण्ड बाजा वाजतो जोरात. वरात आली दारात. _____चं नाव घेतो ..घ्या आता घरात.
चंद्रा मुळे येते समुद्राला भरती.. संसाराच्या रथात _____ माझी सारथी.
पाहुणे आले घरात.. चहा करतेस का.. ____ तुझचं नाव घेतोय एकतेस का.
Marathi Ukhane For Male
क्यारम च्या खेळात जिंकायची असते क्वीन.. मी किंग आणि _____ माझी क्वीन.
लग्नाच्या पंगतीला आहे आहे कोथिंबीर वडी.. ____ आणि मी, आमची १ नंबर जोडी.
लग्न होत दुपारी .. लग्नात आला पाऊस.. ____ साठी बांधणार चंद्रावर हाऊस.
गोर्या गोर्या गालावर तीळ काळा. ____ सोबत फुलेल संसाराचा मळा.
रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस.. ____ साठी बांधणार बंगला.. आणि आंगणात तुळस.
एक होती चिऊ. एक होती काऊ.. ____ आणि मी जाऊन चंद्रावर राहू.
मिबाईलवर खेळतो PUBG गेम.. ____ च आहे माझ्यावर खूप प्रेम.
पत्रिकेत जुळले ३६ गुण.. ओळख करून देतो.. _____ ही तुमची सून.
आला मोट्टा पाऊस सुटला जोरात वारा.. _____ उठ लवकर वाजलेत वाजलेत बारा.
डोंगरावर टेकडी, टेकडीवर मंदिर देवाचं.. सकाळी उठल्यावर आधी नाव घेतो ____ चं
मराठीच्या पेपर ला गणिताचा तास.. _____ ची कॉपी करून झालो मी पास.
नवीन घर घेतलं वन रूम किचन.. ____ सोबत सुखाचा संसार एवढच मिशन.
Marathi Ukhane For Male
मुहूर्त आला जवळ, केलाय मोट्टा थाट.. _____ ची मी बघतोय मांडवात वाट.
मुंबई ते कोल्हापूर आहे ५०० किलोमीटर.. _____ आणि माझ्या लग्नाची क्यासेट बगायला हौसफुल झाल थेटर.
२००० ची नोट चालत नाही, झाली बंद.. ____ सोबत जीवनात आनंदच आनंद.
जमिनीत पेरल धान्य पण पाऊसच पडेना.. _____ शिवाय आता मला गमेना.
शंकरच्या मंदिरासमोर बसला आहे नंदी.. _____ च्या प्रेमाच्या तुरुंगात मी आहे बंदी.
दोन दिवस आहे सुट्टी चल फिरायला जाऊ.. _____ म्हणाली आज काहितरी बाहेरच खाऊ.
नेसायला पैठणी फिरायला गाडी.. _____ साठी बांधणार १० मजली माडी
विमानाच तिकीट काढलय मुंबई ते दुबई. _____ आहे सून आणि मी जावई.
मंदिर चांदीच देवारा सोन्याचा.. _____ मागितला हार १००० मण्याचा.
डोंगराच्या कुशीत आहे आपल सुंदर गाव.. सगळ्यांनी ऐका घेतो _____ चं नाव.
चांदीच्या ताटात आंबे ठेवले कापून .. _____ चं नाव घेतो दोन फोडी चाखून.
आधीच हाऊस त्यात पडला पाऊस.. घास भरवतो, ______ बोट नको चाऊस.
शुभकार्याची सुरवात होते श्री गणेशापासून.. ______ चं नाव घ्यायला सुरवात करतो आज पासून.
दोन दिवस ऊन, दोन दिवस पाऊस.. _____ चं नाव घेतो.. पाहुण्यांनी भरल हाऊस.
एवढी सुंदर बायको पटवायला लागतात खूप कष्ट.. ______ नाव घेतो. सगळ्यानसमोर स्पष्ट.
लग्नात बायकोला करणार सोन्याच मंगळसूत्र, सोन्याच पैजण.. _____ चं नाव घेतो नीट ऐका सर्वजण.
गरम वड्यासोबत लागतो नरम पाव.. _____ चं नाव घ्यायला लागतो मला खूप भाव.
कडाक्याच्या उन्हात पाहिजे गर ऊसचा रस.. _____ चं नाव घेतो, आज आहे स्पेशल दिवस.
लग्न करायला लागते हिम्मत, लागते डेरिंग.. सौंसाराच्या गाडीचं _____ च्या हाती स्टेरिंग.
जेजूरीच्या पायर्या चढताना बायकोला उचलून घेतो.. नाव घेतो ____ चं , पण आधी थोड पाणी पितो.
देवा पुढे लावली समईची जोडी.. _____ मुळे आली जीवनाला गोडी.
गोव्याच्या समुद्रात आली मोठी लाट.. _____ चं नाव घेतो, सोडा आमची वाट.
दारात काढली रांगोळी छान फुलांची.. _____ रानी माझ्या मनाची।
रेशमी साडीला सोन्याचं अस्तर.. ______ आहे आमच्या घरची होम मिनिस्टर.
दत्त दत्त दत्ताची गाय, _____ आवडते दुधाची साय.
घड्याळात वाजले दुपारचे बारा.. _____ घेतो नाव.. ऐकायला जमलाय गाव सारा.
जिंकता जिंकता थोडक्यात हरलो क्रिकेट... _____ नेच काढली माझी विकेट.
हनिमूनला जाणार होतो दूर दूर लांब.. पण ____ म्हणाली मेकअप करायचा आहे थोडा वेळ थांब.
आंब्याला हिंदीत म्हणतात आम.. _____ मला म्हणते हमारे आंगने मे तुम्हारा क्या काम.
पावसात जाऊ फिरायला, लोणावळा खंडाळा.. पण ______ ला येतो लगेच कंटाळा.
मुंबई पेक्षा बऱ आहे पुणे... ____ जपून ठेवलेत माझे फोटो जुने.
सकाळी सकाळी पाहिजे गरम गरम चहा.. ____ आहे खूप सुंदर.. डोळे भरून पहा.
चांदीची नोट सोन्याचा रुपया.. ____ चं नाव घेतो.. बोला गणपती बाप्पा मोरया.
प्रीतीचं झुळझुळ पाणी... ____ माझ्या दिलाची रानी.
कोणी लिहल्या ओवी, तर कोणी लिहली गाथा.. _____चं नाव घेतो.. वाट सोडा आता.
ढग आले आकाशात पाऊस पडला आंगनात.. _____ चं फक्त माझ्या मनात.
लग्न झालं दुपारी.. वाजले होते बारा.. मी बसलो खुर्चीत, ____ घालते वारा.
१० ला एक २० तीन भाजी मेथीची.. _____ आहे माझ्या प्रीतीची.
गुलाबाच्या फुलाला मोगर्याचा सुगंध.. _____ चं नाव घेतो झाला मला आनंद.
लग्न झालं आता, संसार करूया सुखी... ____ चं नाव कायम माझ्या मुखी.
होईल कधी अशी भेट नव्हतं ध्यानी मणी... ____ चं आता माझ्या मनी.
पहिल्या पावसात मातीचा सुटला सुगंध.. ____ ला पाहून झाला माला खूप आनंद.
लग्नात केला नवरीला सोन्याचा हार.. ____ चं माहेर आहे दूर फार.
दोन + दोन = चार.. _____ चं नाव घेतो.. आता जाने दो ना यार.
लग्न झाल दणक्यात, झाला गाज्या वाजा.. _____ माझी रानी, मी तिचा राजा.
नाव घेतो नाव घेतो खात नाही भाव.. _____ चं नाव घेणारा मीच तो _____राव.
वरातीत होता हत्ती, हत्तीवर होती पालखी.. ____ माझी लाख मोलाची.
लाल किल्ल्याला दरवाजे सतराशे साठ.. मी बसलो जेवायला ____ वाढतेय ताट.
लग्न झाल दुपारी.. रात्री आली वरात.. _____ चं नाव घेतो, चला आता घरात.
चहा सोबत खातात पारले जी.. ____ चं नाव घेतो, मी तुमचा दाजी.
लक्ष्मीच्या कृपेने घरात आहेत सुखाच्या राशी.. ____ चं नाव घेतो आजच्या दिवशी.
कारंजीत आहे खोबर्याच सारण.. ____ आहे स्वयंपाकात सुगरण.
श्रावणात बरसती पावसाच्या धारा.. _____चं नाव घेताच सुटतो वारा
पाऊस लागला खूप नदीला आल पाणी.. _____ चं माझी रानी.
Marathi Ukhane For Male
गेलो होतो रानात आणला ससा.. _____चं नाव घेतो, जरा शांत बसा.
पुरन पोळी ला बाटट्याची भाजी.. ______ फक्त माझी.
गोर्या गोर्या गालावर पडते खळी.. _____ चं नाव घेतो लग्नाच्या वेळी.
गाय खाते हिरवागार चारा.. ____ चं घेतो नाव, घाला मला वारा.
बाजारातून आणला हापूस आंबा.. ____ चं नाव घेतो.. थोडा वेळ थांबा.
भाकरी करायला आणली सोन्याची परात.. _____ चं नाव घेता घेता वरात आली दारात.
सुंदर फुलांनी सजली बाग.. _____ समोर मी आहे ससा, माघारी होतो वाघ.
गायीच्या दुधाची पांढरी शुभ्र साय.. _____ चं नाव घ्यायला घाबरतो की काय..
वरातीला आणला पांढरा घोडा... ____ चं नाव घेतो आता वाट सोडा.
नागपुर वरुन आणली ताजी ताजी संत्री.. ____ आमच्या घरची मुख्यमंत्री.
सोन्याच्या मोहरा आणि चांदीची नाणी.. मी बसलो जेवायला ___ वाढतेय पाणी.
भात केलाय बंद चालू आहे डाइट.. ____ सोबत आहे क्यांडल नाइट.
गोव्याच्या पाण्याला म्हणतात ताडी.. ___ ला फिरवायला आणीन सोन्याची गाडी.
आंगण लोटायला आणला सोन्याचा झाडू.. ____ माझी जलेबी, मी तिचा लाडू.
जेजूरीच्या खंडोबाची चांदीची पालखी.. माझ्या वर आता फक्त ____ ची मालकी.
Marathi Ukhane For Male
चंदेरी कुलूपाची सोनेरी चावी.. सातजन्म मला _____ चं हवी.
कोकणातून आणला फणस, खाल्ला एक गरा.. ____ बसते टीव्ही बघत मी घालतो वारा.
संकष्टी ला केले मोडक त्यावर तुपाची धार.. नैवेद्य करायच्या आधीच ___ने खाल्ले चार..