Life Quotes In Marathi: आपल्या जीवनात-आयुष्यात बरेच प्रसंग येतात काही चांगले काही वाईट अवघड, अशा वेळी आपणाला गरज असते ती प्रेरणा आणि आधाराची यासाठी Life Quotes In Marathi मदत करतात. आपणाला नवी दिशा, उत्साह मिळण्यासाठी आणि स्वताचे विचार, प्रगति वाढवण्यासाठी देखील Life Quotes In Marathi खूप मदत होते.
Life Quotes In Marathi
काही न करता गंजून जाण्यापेक्षा, प्रयत्न आणि कष्ट करून जिजून गेलेलं बर. कष्ट केल्याशिवाय यश नाही.
फक्त विचार करत बसून वेळ आणि आयुष्य वाया जाते. त्यापेक्षा सुरवात करा.
यश कितीही दूर उंच असले तरी प्रयत्नांच एक एक पाऊल यशाच्या जवळ जवळ घेऊन जाते.
यशाच्या अग्निहोम मध्ये बलिदानाचे त्याग हवन केल्याशिवाय यश प्राप्ती होणार आहे.
आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे ते उत्तम, यशस्वी बनवण्यासाठी शेवट पर्यंत्त प्रयत्न करा.
माणूस गरीबी मध्ये जन्माला येतो यात त्याची चूक नसते, पण गरिबीमध्ये मरणे यात नक्कीच त्याची चूक आहे.
सोन्या ला देखील वितळल्याशिवाय किंमत, महत्त्व मिळत नाही.
प्रयन्त्त करणारी व्यक्ती कधीच हरत नाही, एक तर यश मिळते नाहीतर अनुभव.
अनुभव हा सर्वात महान गुरु आहे.
खाली पडण्याची भीती असेल तर, कधीच आकाशात ऊंच उडता येणार नाही.
Life Quotes In Marathi
तलवारीचे वार व्रण देतात तर, शब्दांचे वार खोलवर आघात देतात.
आपले संकल्प, लक्ष बोलून दाखवण्यापेक्षा ते सिद्ध करून दाखवा.
नात्यांमध्ये काही वेळेला बोलण्या पेक्षा शांत बसल्याने ती नाती टिकून राहतात.
श्रीमंती मध्ये जन्माला येण आपल्या हाती नसल तरी श्रीमंती मध्ये मरण हे आपल्या हाती आहे.
प्रयत्न हे एकमेव हत्यार ज्याने अपयशावर मात करता येते.
उन्हाचे चटके बसल्याशिवाय पहिल्या पावसाची ओढ, गारवा समजत नाही.
समाजामध्ये बदल, जागृतीचा वणवा उठवायचा असेल तर. प्रत्येकाने एक ठिणगी होऊन पेटून उठा.
दुसर्यांना समजावण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही यशवी झालात की ते तुम्हालाच follow करतील.
दुसर्याच्या खांद्यावर बसून ही जे जग दिसत नाही, ते स्वताच्या पायावर उभे राहून दिसते.
स्वताच्या विजयाचे मोठ श्रेय हे स्वताच्या आई वडिलांना द्या, कारण आपण जिंकण्यासाठी त्याही खूप काही हारलेल असत.
Life Quotes In Marathi
अनुभव जरी इतरांचे असले तरी निर्णय हा स्वताचा हवा.
एका पिढीचा त्याग हा पुढच्या दहा पिढ्यांचे आयुष्य बदलू शकते.
नम्रता हा सज्जन पनाची पहिली ओळख आहे.
पटकन मिळणार्या सुख समृधी मुले अहंकार वाढतो.. आणि हळू हळू मिळणार्या यशामुळे जाणिव वाढते.
श्रीमंतीचा अहंकार हा गरिबीच्या इमानदारी पेक्षा लहानच असतो, जसे समुद्र कितीही मोठा असला तरी त्याने तहान भागत नाही त्यासाठी लहान विहीरीचे पाणीच हव.
मनुष्याचे संपूर्ण आयुष्य यश प्रगति, हार विनाश हे सर्व त्याच्या कर्मा वर अवलंबून आहे.
कोणतीही गोष्ट जगाला समजवण्यात वेळ वाया घालू नका, ती गोष्ट सिद्ध करा. जग तुमच्याकडे तुमचा वेळ मागेल.
आपल्या बोलण्यात गोडवा नसला तरी चालेल पण स्पष्ठता हवी.
निर्णय स्वत:चे असावेत, कारण निर्णय बरोबर ठरला तर कोणी म्हणेल "मी सांगितलं म्हणून झालं."
बापजाद्यांपासून मिळालेल्या संपत्तीची जान आणि, स्व कष्टाने मिळवलेल्या संपत्तीचा अभिमान असयला हवा.
Life Quotes In Marathi
अपयश पचवल्याशिवाय यशाची खरी चव ओळखता येत नाही.
स्वत: निवडलेल्या वाटेवर माणूस कधी हरवत नाही, त्याला त्याची मंजिल माहीत असते.
स्वाभिमाना पुढे नाती तुटली तरी त्यांचं दु:ख नाही वाटत, समाधान वाटते.
संकटांचे आभार माना, त्यामुळेच आपले कोण आणि परके कोण कळतं.
संधी ही प्रत्येकाला मिळते,पण त्याच सोन कराच की माती हे त्याच त्यान ठरवायचं॰
भरलेला खिसा दुनिया दाखवतो, आणि रिकामी खिसा दुनियादारी दाखवतो.
निर्णय योग्य नसतात, त्यांची योग्यता सिद्ध करून दाखवावी लागते.
प्रत्येक पाऊल बरोबरच पडेल अस नाही, पण प्रत्येक पावलासोबत एक एक गोष्ट शिकत च माणूस ध्येय गाठू शकतो.
सयंम हा धनुष्यावर ताणलेला बनसारखा असतो. जेवढा जास्त ताणला जाईल, त्याचा प्रभाव ही तितकाच मोठा असतो.
नशीब पण राजा त्यालाच बनवतं, ज्याच्या अंगात काही करून दाखवायची धमक आहे.
Life Quotes In Marathi
आरडा-ओरड करून प्रसिद्धी नाही मिळत, कर्म असे करा की शांततेत सुद्धा चर्चा होईल.
तुमचा मार्ग तुम्ही स्वत: निवडा, कारण तुम्ही स्वत: जास्त चांगलं ओळखता.
वेडे लोक चं इतिहास घडवतात, आणि नंतर शहाणे लोक त्याचं इतिहासाचा अभ्यास करतात.
इतरांच्या पेक्षा मोठ बनायच असेल तर, खराब पेक्षा खराब परिस्थिती मध्ये पण लढता आल पाहिजे.
वेळ खराब असेल तर, लोक वाट नाही दाखवत... चुका दाखवतात.
आपली बरोबरी न करणारेचं लोक आपल्या विषयी वाईट बोलतात.
यश हे आपल्या कपाळीच असत, फक्त मेहनतिने त्यावरची धूळ साफ कराची असते.
आपल्या सोबत कोणी नाही म्हणून काय झाल, आकाशात उंचावर गरुड हा एकटाच असतो.
मदत मागितल्याने कोणी लहान होत नाही, पण मदत केल्याने नक्कीच मोठ होता येत.
इतिहास बनवायचा असेल तर सर्वात आधी आपली धाव भविष्याकडे असायला हवी.
Life Quotes In Marathi
मार्ग दिसत नाही अस कधी होत नाही, दोष डोळ्यांचा नाही, नजरेचा आहे.
यशाच्या मार्ग हा आपल्या पायाखालीच आहे, फक्त आपण चालल पाहिजे.
पावसाची वाट बघत बसण्यापेक्षा समुद्राकडे चालत रहा.
कोणाची तरी सोबत मिळेल म्हणून वाट बघत बसू नका. चालत रहा, पुढे तुम्ही कोणाला तरी सोबत देऊ शकाल.
यश हातात आल्यावर नाही, तर ते पचवल्यावरचं विजय निच्छित होतो.
युद्धात शत्रूला हरवण्या आधी त्याच्या हिंम्मतीला हरवणे महत्वाचे असते.
कठोर शब्दांच्या मागे भक्कम अनुभव उभा असतो.
यशाची गगनभरारी मारायची असेल तर, प्रयत्नाच्या पंखामध्ये जिद्द, धाडस आणि हिम्मत असला हवी.
प्रयत्नांनी टाकलेल प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात.
शर्यत जिंकता आली नाही तरी चालेल पण ती गजवता आली पाहिजे.
Life Quotes In Marathi
मनुष्याने मनाने श्रीमंत आणि अहंकाराणे गरीब असयला हव.
यशाच्या उंच शिखरावरूचं आयुष्य सुंदर दिसते.
रडयला नाही, तर लढायला शिका.
यशाला हात घालायचा असेल तर स्वत:च्या पायावर उभं राहता आल पाहिजे.
भीती माणसाला कमजोर बनवते. आणि धाडस माणसाला विजेता बनवतो.
गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर, स्वत:चे पंख मजबूत आणि विशाल बनवा.
यशाचे लक्ष साधायचे असेल तर, कष्टाच्या धनुष्यावर जिद्द रूपी बाण हवा.
पडलो म्हणून घाबरायच नाही, हारलो म्हणून रडायच नाही, मंजिल गाठल्याशिवाय जिद्द सोडायची नाही.
माणुसकीच्या बाजारात एकाच गोष्टीची किंमत लावली जाते. ईमान
डोक्यात अक्कल येण्यासाठी पायांना ठेच खावी लागते.
Life Quotes In Marathi
ठेच लाग्यावर वेदना झाल्या तरी त्यामुळे विचारांना धार येते.
घरच्या भाकरी ची किंमत तेंव्हा कळते जेंव्हा आपण स्वत:च्या पैशाने फक्त वडपावच परवडतो.
सतत दुसर्याला सांगत बसण्यापेक्षा कधी कधी स्वत:हून समजून घेतलं पाहिजे.
नाही हा शब्द तुम्हाला कमजोर बनवत नाही.
चांगुलपणा हा जास्त दाखवला तर लोक त्याचा फायदा घेतात.
वाणी आणि विचार या वरुन माणसाची कुवत ठरते.
कष्ट करायला जो माणूस काळ वेळ पाहत नाही, भविष्यात तो नक्कीच चांगले दिवस पाहतो.
जीवनाच्या शेवटी स्वत:सोबत फक्त एकच गोष्ट घेऊन जातो. इज्जत.
आयुष्यात आपल्या नावासमोर एक पदवी कायमं असायला हवी, ती म्हणजे चांगला माणूस.
आकाशात ऊंच उडायच असेल तर माती पासून दूर जाव लागत.
स्वाभिमान हा स्वत:च्या कष्टाच्या फाटक्या कपड्यात ही रुबाबदार दिसतो.
Life Quotes In Marathi
परिसस्थितीच्या शाळेत जबाबदारीचं पुस्तकं सर्व काही शिकवत.
न मागता केलेली मदत लोक सहज विसरून जातात.
समोर असताना गुणगान, पाठीमागे अपमान. दुनिया अशीच आहे बेइमान.
संघर्ष हे प्रगतिचे लक्षण आहे. ज्याची अंगी ते आहे. त्याचे भविष्य उज्वल आहे.
आयुष्य तेजस्वी बनवायचे असेल तर स्वत: प्रज्वलित व्हा.
स्वाभिमान हा सर्वात महाग दागिना आहे. एकदा विकला गेला तर पुन्हा खरेदी करता येत नाही.
परिस्थितीची जाणीव आणि यशाची उणीव यामुळे माणूस घडतो.
मागून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही भीक आहे, आणि मेहनत करून करून मिळालेली गोष्ट हे यश आहे.
स्वप्न खरी होण्यासाठी आधी ती पाहावी लागतात.
आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, त्यासाठो तुमचे विचार स्कारात्मक हवे.
Life Quotes In Marathi
पुस्तकं आणि माणस वाचल्याशिवाय कळत नाहीत.
कोणतेही काम ५० टक्के तेंव्हाच पूर्ण होऊन जात जेंव्हा तुम्ही ते सुरू करता.
कानांनी ऐकलेल्या बर्याच गोष्टी, डोळ्यांनी खर्या खोट्या पाहिल्याशिवाय, तोंडाने काहीही बोलू नका.
स्वप्नांच्या वृक्षाला कष्टाचे पाणी, आणि प्रयत्नांची मशागत असले तरच त्याला यशाची गोड फळ लागतात.
विचारांना कृतीची साथ असेल तरचं स्वप्न खरी होतात.
यश मिळवायला वेळ लागत नाही, तर मनापासून केलेले कष्ट लागतात.
आनंदातील कौतुका पेक्षा, दु:खातील अनुभव जास्त जवळचे वाटतात.
नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशीब तुमच्या कष्टावर अवलंबून असते.
स्वप्न बघायला पैशे लागत नाहीत, पण ती खरी करण्यासाठी आयुष्य खर्च कराव लागतं.
संकटांना न घाबरता, त्यांना भेदूनचं यशाचा निशाणा साधता येतो.
Life Quotes In Marathi
यशस्वी होण्याचा मार्ग शोधाचा नसतो, स्वता बनवायचा असतो.
जगाची विचारपूस करत बसन्यापेक्षा, स्वताच्या ध्येयाला काय हव नको ते पहिलं पाहिजे.
स्वता घेतलेल्या निर्णय चुकला, त्यातून यश नाही मिळालं तरी अनुभव नक्की मिळतो.
भुखेला जीव समोर असताना, देवाला नैवेद्य दाखवणे पाप आहे.
वादविवाद मध्ये बुद्धीचा कमी जास्त पणा दिसतो, संवादामध्ये विचारांची समानता दिसते.
गैरसमज हा रंगीत काचेचा सारखा आहे, त्यातून पाहिल्यावर सर्व काही त्याच रंगाचं दिसत.
कारण शोधत बसाल तर, ध्येय कधी सापडणार नाही.
मेहनत ही चंदना सारखी आहे, जेवढ उगळाल तेवढा यशाचा सुगंध येईल.
तलवारीला शिक्षणाचं पाणी पाजल तर, विचारांना धार येते.
नशीब बदलायला हातावर रेषा लागत नाही, तर मनगटात ताकत असावी लागते.
संधी कधी चालून येत नाही, ती निर्माण करावी लागते.
Life Quotes In Marathi
यश हे स्वताला हवे असेल तर, निर्णय देखील स्वताचा हवा.
खूप कमी लोक यशस्वी होतात, कारण खूप कमी लोकचं वेगळी वाट निवडतात.
यशाचे ढोल वाजवायचे असतील तर, मेहनत शांततेत करा.
सातत्य असेल तर कठोर दगडाला ही पाणी भेदून तोडून टाकते.
स्वप्न ही खरी होतात, फक्त ती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागतात.
सराव जेंव्हा सवय बनते, तेंव्हा अपयश मागे जाऊन यश मिळते.
लोक आपल्यावर जळायला लागले की समजून जायच, आपण प्रगति करतोय.
एका रात्रीत नशीब बदलते पण, त्या मागे कित्येक दिवसांची मेहनत असते.
हारल्यावर लोकं नावं ठेवतात आणि, जिंकल्यावर लोक नाव काढतात.
अपयशावर मात करायची असेल तर मार्ग बदला, लक्ष बदलू नका.
लांब उडी मारण्यासाठी दोन पावलं माग जाव लागत.
यश जर स्वताला पाहिजे असेल, मार्ग सुद्धा स्वत: बनवावा लागतो.
Life Quotes In Marathi
निर्णय हे कधी चुकीचे नसतात. ते सिद्ध करायचे असतात.
शब्द जर तलवार असेल तर, विचार हे ढाल आहेत.
चांगल्या वेळीची फक्त वाट बघत बसाल तर, वाईट वेळ कधीच संपणार नाही.
हातोड्याचे घाव खाल्ल्यावर चं लोखंड मजबूत होत.
संगत म्हणजे कृष्ण आणि शकुनी, योग्य संगत असेल तरचं विजय आहे.
संगत ही विचारांच्यावर पडणारी सावली आहे.
काही शब्द कडू असले तरी, त्यांचा हेतु गोड असतो.
मोठ मोठ्या लाटांना धडक मारून जी जहाज पुढे जातात, तीच समुद्र जिंकतात.